म्हापसा पोलिस स्थानकात सूचनाफलक आवश्‍यक

notice board
notice board

म्हापसा

प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत सार्वजनिक तक्रारी ऐकण्याचा दिवस असल्याची सूचना म्हापसा पोलिस स्थानकात महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने या स्थानकात सुयोग्य ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन आरटीआय कार्यकर्ता जवाहरलाल शेट्ये यांनी म्हापसा पोलिस स्थानकाच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना सादर केले आहे.
असा सूचना फलक उभारणे सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टीने अतिशय अत्यावश्‍यक आहे; जेणेकरून अन्याय झालेल्या व्यक्‍तींना तसेच अन्य तक्रारदारांना स्वत:च्या कैफियती योग्य त्या पोलिस अधिकाऱ्यांसमोर अथवा कर्मचाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे, पोलिस निरीक्षक अथवा उपविभागीय पोलिस अधिकारी यांसारख्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या समस्येवर तिथल्या तिथे तोडगा काढला जाऊ शकतो, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पर्वरी पोलिस स्थानकामच्या दर्शनी भागातील प्रवेशद्वाराच्या भागात अशा प्रकारचा सूचना फलक उभारण्यात आल्याचेही या निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तसेच, या निवेदनाची प्रत म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांना सादर करण्यात आली आहे.
दरम्यान, आपल्या तक्रारीला अनुसरून म्हापसा पोलिस स्थानकात पेयजलाची सोय तसेच लिफ्ट व व्हिल चेअर यासंदर्भात लगेच कार्यवाही केल्याबद्दल शेट्ये यांनी या म्हापसा येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com