GOMACO: वैद्यकीय कचऱ्याची रुग्णालयाच्या आवारातच विल्हेवाट लावल्या प्रकरणी कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस

दैनिक गोमंतक
बुधवार, 9 जून 2021

या प्रकरणाची मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले होते. 

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GOMACO) इस्पितळाच्या आवारातच वैद्यकीय कचऱ्याची (Medical waste) विल्हेवाट लावल्या प्रकरणी महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी इकोक्लिन या साफसफाई व सोडेक्सो या जेवण पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना तीन दिवसाच्या आत नोटीसीला उत्तर देण्यास  सांगण्यात आले आहे. (Notice to companies for disposal of medical waste in GOMACO premises)

इस्पितळाच्या आवारातच रुग्णांसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची विल्हेवाट लावताना ते जाळण्यात आले होते. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी घेऊन डॉ. बांदेकर यांना त्यासंदर्भात चौकशी करून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

Goa: बावीस कोटींच्या IVERMECTIN प्रकरणात औषध खरेदी समिती बरखास्त

संबंधित बातम्या