आता गोवा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण: मुख्यमंत्री सावंत

कोरोनाच्या काळात (Covid19) राज्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता.
आता गोवा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण: मुख्यमंत्री सावंत
Chief Minister Pramod SawantDainik Gomantak

सासष्टी: कोरोनाच्या काळात (Covid19) राज्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्यामुळे गोव्याला दुसऱ्या राज्यावर अवलंबून राहावे लागत होते. गोव्याला भेडसावणारी ही समस्या दूर करण्यासाठी पीएम केअर निधीतून राज्यातील सात विविध इस्पितळात नवीन वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले असून गोवा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण बनलेला आहे, असे उद्गार मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी काढले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज देशातील विविध राज्यात सुरू करण्यात आलेल्या एकूण 35 पीएसए ऑक्सिजन प्रकल्पाचे व्हर्च्युअल उदघाटन केले. तर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ आणि मडगाव ईएसआय इस्पितळात सुरू करण्यात आलेल्या पीएसए ऑक्सिजन प्रकल्पाचे केले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी वरील उदगार काढले. यावेळी आरोग्य मंत्री विश्वजित राणे, कामगार मंत्री जेनिफर मोन्सेरात, आरोग्य संचालक डॉ आयरा आल्मेदा, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक दीपा कुरेया, ईएसआय इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक विश्वजित फळदेसाई व इतर उपस्थित होते.

Chief Minister Pramod Sawant
Goa Election: अनेकांना तिकिटे नाकारली जातील : मुख्यमंत्री

प्रधानमंत्री केअर निधीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पामुळे गोवा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण बनला असून या व्यतिरिक्त ऑक्सिजनचा साठ्याची कमतरता भासू नये, यासाठी एलएमओ टँक उभारण्यात येणार आहे. कोरोनामुळे राज्यात आरोग्य संबंधी साधनसुविधा बळकट करण्यात आल्या आहेत. राज्यात कधीही तिसरी लाट येण्याची शक्यता असून तिसऱ्या लाटेसाठी गोवा तयार आहे. गोमंतकीयांनी स्वतःला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी लसी घेणे आवश्यक असून 30 ऑक्टोबर पर्यत लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

Chief Minister Pramod Sawant
Goa Politics: ‘भाजप खरेच डेंजर झोन’मध्ये आहे का?

गोव्यात प्रथमच कोरोनाचा रुग्ण सापडला होता तेव्हा सरकारने मडगावमधील ईएसआय इस्पितळाचे कोविड इस्पितळात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. ईएसआय इस्पितळातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र कोविड रुग्णांसाठी काम केले असून या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचा सत्कार होणे गरजेचे आहे. सरकार आणि आरोग्य विभागाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काम केले असून लोकांनी रस्त्यावरील खड्ड्यावर टीका करताना केलेल्या कामाची स्तुतीही केली पाहिले,असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या लोक सेवेला आज 20 वर्षे पूर्ण झाली असून या 20 वर्षात मोदींनी देशाला नवी दिशा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात साधनसुविधा उभारण्यात आल्या असून या साधनसुविधा उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून चांगले सहकार्य मिळाले आहे. राज्यातील विविध इस्पितळात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले असून हे प्रकल्प ऑक्सिजन कमतरता दूर करण्यास उपयुक्त ठरणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. कोरोनाविरुद्ध लढण्यास महत्वाची भूमिका बजावलेल्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आलेले नसून या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे कामगार मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com