राज्य सरकारकडून सचिवांच्‍या बदल्‍या; मिहीर वर्धन राज्यपालांचे नवे सचिव

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या खात्यात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. अवर सचिव (कार्मिक १) शशांक ठाकूर यांनी हा आदेश आज जारी केला.

पणजी: राज्यपालांचे सचिव नीरजकुमार ठाकूर यांच्याकडे आता राज्य सरकारने सर्वसाधारण प्रशासन, नागरी पुरवठा, गोवा गॅझेटीयर, छपाई व लेखनसामग्री, वस्तुसंग्रहालये आणि राज्यशिष्टाचार खात्यांचा ताबा दिला आहे. राज्यपालांचे सचिव म्हणून आता मिहीर वर्धन काम पाहतील. 

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या खात्यात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. अवर सचिव (कार्मिक १) शशांक ठाकूर यांनी हा आदेश आज जारी केला. त्यानुसार आजवर राज्य मुख्य मतदार अधिकारी या पदावर काम करणाऱ्या कुणाल यांच्याकडे त्या खात्यासह सचिव (निवडणूक), ऊर्जा व पर्यावरण खात्याचा ताबा दिला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या