NSUI शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

NSUIने गोवा विद्यापीठात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोष्टींची दिली माहिती
NSUI शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
NSUI delegation meets Goa GovernorDainik Gomantak

गोवा विद्यापीठाच्या (Goa University) प्राणीशास्त्र विभागात अनेक प्रकारचे गैरव्यवहार आणि बेकायदेशीर गोष्टी सुरू असल्याची माहिती देण्यासाठी एनएसयूआयच्या शिष्टमंडळाने राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai Governor of Goa) यांची भेट घेतली.

गोवा विद्यापीठातील प्रा. नितीन सावंत यांनी अनेक प्रकारचे गैरव्यवहार करत कनिष्ठ संशोधकाचे संशोधक आपल्या नावावर प्रसिद्ध केले आहे. याशिवाय अवैध पद्धतीने गुजरातेतील संशोधक दिकांक्ष परमार यांना सेवा मुक्त केले आहे. परमार यांचे संशोधन आपल्या पत्नीच्या नावे प्रसिद्ध केले आहे. या प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार झाल्याची माहिती एनएसयूआयच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना देत या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.