Goa NSUI: पॉलिटेक्निकची परीक्षा ऑनलाइन घ्या
Polytechnic Students

Goa NSUI: पॉलिटेक्निकची परीक्षा ऑनलाइन घ्या

पर्वरी: तांत्रिक शिक्षण संचालनालयाने(Directorate of Technical Education) पॉलिटेक्निकच्या(Polytechnic) तृतीय वर्ष विद्यार्थ्यांच्या(Students) ऑफलाईन परीक्षा(Online Exam) घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो रद्द करून ऑनलाईन घ्याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गोवा शाखेचे(Goa) प्रमुख नौशाद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली, शिष्टमंडळाने तांत्रिक शिक्षक मंडळाचे सचिव नारायण पेडणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

सरकारने ही परीक्षा रद्द केली तर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बंगल्याच्या बाहेर धरणे धरतील, असा इशाराही चौधरी यांनी दिला. सचिव पेडणेकर यांनी ही मागणी तांत्रिक मंडळाच्या बैठकीत ठेवतो, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

सध्या ‘कोविड’ संकटाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या परिस्थितीत ही परीक्षा ऑफलाईन घेऊन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नका. गोव्यातील विविध पॉलिटेक्निकच्या विभागातून जवळजवळ दीड हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ‘कोविड’ संबंधीच्या सुरक्षितेच्या नियमांचे कितीही पालन केले तरीही एखादा बाधित विद्यार्थी अनेक विद्यार्थ्यांना संक्रमित करू शकतो. याचा विचार करून सरकारने निर्णय घ्यावा. 

गोवा तांत्रिक मंडळाकडे आमचे प्रात्यक्षिक, थिअरी अशा परीक्षा मिळून 70 गुण आहेत. ऑफलाईन परीक्षा 30 गुणांची घेऊन असा कोणता मोठा बदल होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि तांत्रिक मंडळाने यात लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी चौधरी यांनी केली.

...तर अट्टाहास का? 
गोवा विद्यापीठाने आपल्या सर्व परीक्षा रद्द करून ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा इंजिनिअरिंग कॉलेज यांच्याही परीक्षा ऑनलाईन आहेत. मग पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा अट्टाहास का? असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com