विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या कॉन्स्टेबलवर कारवाई करा; एनएसयूआयची मागणी

एनएसयूआयच्या गोवा शाखेचे अध्यक्ष नौशाद चौधरी (Naushad Chaudhary) यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज संदर्भात पोलीस महासंचालक आणि मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या कॉन्स्टेबलवर  कारवाई करा; एनएसयूआयची मागणी
NSUIDainik Gomantak

पणजी: एनएसयूआयच्या (NSUI) गोवा शाखेचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज संदर्भात पोलीस महासंचालक आणि मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. "8 जानेवारी 2022 रोजी, आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांना भेटण्याचा प्रयत्न करत असताना चर्च स्क्वेअर-पणजी येथे पोलिस कॉन्सटेबलने अचानक लाठीचार्ज केला." असे तक्रारीत म्हटले आहे.

“कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेण्याची विनंती करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार होतो. मात्र, पोलिसांनी आम्हाला पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर आमच्या तक्रारी न ऐकता आम्हाला ताब्यात घेण्यात आले,”असे ते पुढे म्हणाले. “पोलिसांनी अचानक निर्दयीपणे लाठीचार्ज केला. त्यामुळे लाठीचार्ज कोणी केला हे स्पष्ट व्हावे, या घटनेची चौकशी करण्याची आमची मागणी आहे’’ असे चौधरी यांनी म्हटले आहे.

NSUI
सीईओचे गोवा सरकारला 'या' कामांची यादी सादर करण्याचे निर्देश

पोलिसांनी (Police) लाठीचार्ज करून शांततापूर्ण मोर्चाला हिंसाचारात बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कायदा हातात घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. "पोलिसांनी या कॉन्स्टेबलवर कारवाई करावी अन्यथा भाजप सरकार (BJP government) विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत नाही हे सिद्ध होईल." असे चौधरी म्हणाले. या कॉन्स्टेबलने लाठीचार्ज करतानाचा व्हिडीओ त्यांनी पोलिस महासंचालक आनी मानवाधिकार आयोगाला दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com