गोवा विद्यापीठात प्रलंबित निकालातील घोटाळ्याप्रकरणी NSUI ची निदर्शने
NSUIDainik Gomantak

गोवा विद्यापीठात प्रलंबित निकालातील घोटाळ्याप्रकरणी NSUI ची निदर्शने

तात्पुरती गुणपत्रिका देण्यासाठी पैसे आकारू नये कारण गोवा विद्यापीठ (University of Goa) गुणपत्रिका देण्यात अपयशी ठरले आहे.

पणजी: गोवा विद्यापीठाने (University of Goa) गेले चार महिने विद्यार्थ्यांचे निकाल आणि गुणपत्रिका दिलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना तात्पुरती गुणपत्रिका साठी अर्ज करायला सांगतात त्यासाठी पैसे मागितले जाते. हा लाखो रुपयांचा घोटाळा आहे, असा आरोप एनएसयुआयचे (NSUI) अध्यक्ष नौशाद चौधरी (Naushad Chaudhary) यांनी केला. त्यांनी गोवा विद्यापीठात समोर गुरुवारी जोरदार निदर्शने केली. तात्पुरती गुणपत्रिका देण्यासाठी पैसे आकारू नये कारण गोवा विद्यापीठ गुणपत्रिका देण्यात अपयशी ठरले आहे. निकाल तातडीने जाहीर करावे आणि तात्पुरत्या गुणपत्रिकेसाठी घेतलेले विद्यार्थ्यांचे पैसे परत करावे. तसेच भविष्यात पैसे आकारू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. निकाल आणि गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थ्यांना समस्या निर्माण झाल्या आहेत.

 NSUI
'नवभारताच्या' स्वप्नपूर्तीसाठी भाजपला साथ द्या: जे.पी. नड्डा

विद्यार्थ्यांना नोकऱ्या आणि प्रवेश मिळत नाही. गोवा विद्यापीठाचे प्रशासन निकाल जाहीर करण्यात अपयशी ठरले आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठांच्या नियमाप्राणे परीक्षा झाल्या नंतर 4 आठवड्यात निकाल जाहीर झाला पाहिजे. पण अद्याप निकाल जाहीर झाला नाही याचे कारण काय आहे असा प्रश्न त्यांनी केला. परीक्षा नियत्रकाना निकाल कधी जाहीर करण्यात येणार ते माहीत नाही. ते तात्पुरती मार्कशीट साठी अर्ज करायला सांगतात त्यासाठी पैसे मागितले जाते. हा सर्व घोटाळा आहे. 295 रुपये गुणपत्रिकेसाठी मागितले जाते. हजारो विद्यार्थी नी अर्ज केले आहे. हा लाखो रुपयांचा घोटाळा आहे, असा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) हे सरकार तुमच्या दारी कार्यक्रमा अंतर्गत जसे मतदार संघात फिरतात तसे त्यांनी एक दिवस गोवा विद्यापीठात यावे आणि प्रलंबित निकालांची चौकशी करावी, असे नौशाद चौधरी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com