कोरोनामुळे फोंड्यात ५३ जणांचा बळी!

The number of corona patients has increased in Fonda taluka
The number of corona patients has increased in Fonda taluka


फोंडा: कोरोनामुळे फोंडा तालुक्‍यात आतापर्यंत ५३ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाचा फटका फोंडा तालुक्‍यातील सर्वच भागाला बसला असून मध्यंतरी कमी झालेले रुग्ण आता परत वाढीस लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या फोंडा तालुक्‍यात कोरोनाचे १६० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. 

राज्यात तसेच फोंडा तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने ही चिंतेची बाब आहे. कवळे पंचायत क्षेत्रात एकाच दिवशी सात कोरोना रुग्ण सापडले असून इतरांची तपासणी करण्यात आली असून अहवाल अपेक्षित आहे. देऊळवाडा - कवळे भागात कोरोना रुग्ण सापडले असल्याने शांतादुर्गा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. हा निर्णय खबरदारीच्या स्वरुपात स्वागतार्ह असून प्रत्येकाने कोरोनापासून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे. आता पर्यटकांची संख्या वाढल्याने त्यांच्यामुळे हा धोका अधिक वाढला आहे. लक्षात घ्या, कोरोना संपलेला नाही. त्यामुळे काळजी घ्या, आणि इतरांनाही काळजीमुक्त करा.


- राजेश कवळेकर (सरपंच, कवळे ग्रामपंचायत)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com