गोव्यातील कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढली

number of corona tests increased in Goa
number of corona tests increased in Goa

पणजी : राज्यातील कोरोनासंदर्भातील स्थिती दिवसेंदिवस सुधारत आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोग्य खात्याने राज्यभरात केल्या जाणाऱ्या चाचण्यांची संख्या सरासरी २ हजारपर्यंत वाढविली आहे. जी पूर्वी सरासरी १५०० ते १६०० च्या दरम्यान होती. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. आजच्या दिवशी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यात आजवर झालेल्या मृत्यूंची संख्या ६८७ वर येऊन पोहचली आहे. आजचा रिकव्हरी रेट ९५.७८ टक्के आहे. आज ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला तो रुग्ण ७२ वर्षीय पुरुष होता. हा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ, बांबोळी येथे झाला. 


आज दिवसभरात ११५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर १३५ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्या राज्यात एक हजार तीनशे सत्तावीस इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील उत्तर गोव्यातील कोरोना केअर सेंटरची क्षमता २७५ खाटांची आहे यातील २२० खाट सध्या रिकामे आहेत, तर दक्षिण गोव्यातील कोरोना केअर सेंटरची क्षमता ६० असून यातील ४७ खाट रिकामे आहेत. सरकारकडे लोकांच्या उपचारासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.  राज्यात पर्वरी आरोग्य केंद्रात  १०२, मडगाव आरोग्य केंद्रात  १०९, फोंडा आरोग्य केंद्रात  १०४, वास्को आरोग्य केंद्रात  ६७, लोटली आरोग्य केंद्रात ४०, पणजी आरोग्य केंद्रात ८२ आणि चिंबल आरोग्य केंद्रात ६८ रुग्ण उपचार घेत आहेत. 

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com