राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५

dainik gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

सापडलेले दोन रुग्ण पती पत्नी आहेत. त्यांच्याकडे गोव्यातील त्यांच्या घराचा पत्ताही आहे.

पणजी,
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा गुरुवारी २ रुग्णांनी वाढला आहे. इतर रुग्णांप्रमाणे हे रुग्णही बाहेरून आलेले आहेत. यासह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ झाली आहे. अजून ३९ जनांच्या चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहे. सध्या या रुग्णांवर इएसआय रुग्णालयात उपचार सुरू असून यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत माहिती आणि प्रसिद्ध खात्याचे सचिव संजय कुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आज सापडलेले दोन रुग्ण पती पत्नी आहेत. त्यांच्याकडे गोव्यातील त्यांच्या घराचा पत्ताही आहे. एका दर्यावर्दीची ट्रू नेट कोरोना पडताळणी चाचणी पॉझिटीव्ह आली होती मात्र नंतर त्याच्या थुंकीच्या नमुन्यांना जेव्हा गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील व्हायरॉलॉजी लॅबमध्ये तपासण्यात आले तेव्हा दोन्ही वेळा त्याची चाचणी निगेटीव्ह आली आहे. याचाच अर्थ हा रुग्ण कोरोना निगेटिव्ह आहे, आणि सतर्कता म्हणून मार्गदर्शक सूचनेनुसार इतरांप्रमाणे या रुग्णालाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
राज्याबाहेर जाण्यासाठी आतापर्यंत सुमारे १.२५ लाख लोकांनी नावनोंदणी केली आहे. यातील ३८ हजारपेक्षा अधिक लोक त्यांच्या राज्यात पोहचले आहेत. उद्या म्हणजेच शुक्रवारी आणखी ६ रेल्वे जाणार आहेत. सापडलेले दोन रुग्ण पती पत्नी आहेत. त्यांच्याकडे गोव्यातील त्यांच्या घराचा पत्ताही आहे.

संबंधित बातम्या