डिचोली तालुक्यात केवळ  एक कोरोनाबाधित रुग्ण 

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

 ऐन दिवाळी सणाच्या धामधुमीत डिचोली तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. शुक्रवारी तालुक्यात केवळ एकच कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला आहे,

डिचोली: ऐन दिवाळी सणाच्या धामधुमीत डिचोली तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. शुक्रवारी तालुक्यात केवळ एकच कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला आहे, तर मागील आठवड्यापासून  डिचोलीतील कोविड सुविधा केंद्रात एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळाली आहे.

आज मये आणि साखळी  विभागात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. केवळ डिचोली विभागात १ नवीन  कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. शुक्रवारी डिचोली विभागात ४९, मये विभागात ३० आणि साखळी विभागात १८ मिळून तालुक्यात एकूण ९७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. आज तालुक्यातील केवळ साखळी विभागात ७ रुग्ण बरे झाले आहेत, तर डिचोली आणि मये विभागात एकही रुग्ण बरा झालेला नाही.

डिचोलीत - ४६ मयेत - २८ आणि साखळीत - १५ मिळून ८९ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. डिचोलीतील ३, मयेतील २ आणि साखळीतील ३ मिळून तालुक्यातील ८ रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली आहे.

संबंधित बातम्या