Covid-19: गोव्याने 1 लाख कोरोना रूग्णसंख्येचा टप्पा ओलांडला

The number of Covid patients in Goa has reached 1 lakh today
The number of Covid patients in Goa has reached 1 lakh today

पणजी: राज्यातील(Goa) कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने कोविड निर्बंध लागू करूनही त्याचा कुठलाही योग्य परिणाम झालेला नाही. दररोज रूग्ण संख्या वाढत आहे. आजपर्यंत गोव्यात कोविड(Covid-19) रूग्णसंख्येने एकूण 100902(1 lakh corona patients) रूग्णसंख्येचा टप्पा गाठला. गोव्यात कोविडचे बळीही जात आहे. आणि आता कोरोना रूग्णसंख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या चोवीस तासांत 52 रूग्ण कोविडचे बळी ठरले. दिवसभरात 2814 नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले. त्यातील तब्बल 2426 लोक गृह अलगीकरणात राहिलेले आहेत. उर्वरित लोक हे सरकारी इस्पितळात दाखल झालेले आहेत. यावरून लोकांचा सरकारच्या उपचारावर भरोसा नसून घरीच राहून औषधोपचार करण्यावर लोकांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.(The number of Covid patients in Goa has reached 1 lakh today)

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरामध्ये 6552 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2814 नवे कोरोनाबाधित सापडले तर 1770 कोरोनाबाधित बरे झाले. आज सर्वाधिक 52 मृत्यू झाले. यापूर्वी  एका दिवसात 54  व 52  मृत्यू  झाले होते.  मात्र त्यातील काही मृत्यू अगोदरच्या दिवसातील होते, असे स्पष्टीकरण आरोग्य खात्याने केले होते. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आता 1372वर पोचली असून राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 26731 वर गेलेली आहे.  देशांमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्गित सापडण्याचे प्रमाण गोव्यामध्ये असून ते 43 टक्के एवढे आहे आणि कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी बरीच खालावली असून ती 72.15 टक्के एवढी आहे.

गेल्या चार दिवसांमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या तब्बल 204 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमित व्यक्तीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोवा सरकार जो दिलासा कोरोना रुग्णांना देत आहे, तो दिलासा कोरोना रुग्णांसाठी पुरेसा ठरत नाही.  गेल्या चार दिवसांमध्ये जसे 204 कोरोनाबाधित मृत्यू  पावले. त्याचबरोबर गेल्या चार दिवसांत तब्बल 9850 नवे कोरोनाबाधित रुग्णही सापडले आहेत. यावरून कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेले कोविड निर्बंध कुचकामी ठरल्याचे स्पष्टपणे जाणवत असून गोवा सरकारने आता यावर गंभीरपणे विचार करून नव्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे.

विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावून परराज्यातून जे लोक गोव्यामध्ये येतात त्यांना कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्याची मागणी केलेली आहे. कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी होण्यास झालेला नाही. दिवसाला 2000 ते 3000 नवे कोरोना संक्रमित व्यक्ती सापडू लागल्यामुळे त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. 

कडक निर्बंध कुठे?
कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी होण्यास झालेला नाही. दिवसाला 2000 ते 3000 नवे कोरोना संक्रमित व्यक्ती सापडू लागल्यामुळे त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढून दिवसाला चाळीस ते पन्नासच्या आसपास मृत्यू होऊ लागल्यामुळे राज्यात 29 एप्रिल पासून कोविड निर्बंध लागू केले आहेत. मात्र कडक निर्बंध लागू करून सहा दिवस उलटले तरीसुद्धा अद्याप त्याचा सकारात्मक असा परिणाम दिसून आलेला नाही. त्यामुळे कडक निर्बंध कुठे आहेत, असा प्रश्न निर्माण होतो.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com