कोविड रुग्णांच्या बळींची संख्या १०४!

Tejashree Kumbhar
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाबतची स्थिती गंभीर होत चालली आहे. आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती गोवा आरोग्य खात्याने दिली. ज्यामुळे राज्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूंची संख्या १०४ वर पोचली आहे. जनमानसात आता कोरोनाची भीती अधिकाधिक वाढत चालली आहे.

पणजी

दरम्यान, आज दिवसभरात राज्यात २८७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर १२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात असणाऱ्या सक्रिय कोरोनाग्रस्तांचा आकडा ३७६० वर पोचला असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.
आज ज्या कोविड रुग्णांचा मृत्यू झाला त्यामध्ये वास्को आरोग्य केंद्रात दाखल असलेल्या ६० वर्षीय पणजीतील पुरुषाचा, गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या चिंबल येथील ३६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या दोघांचा मृत्यू १४ ऑगस्ट रोजी झाल्याची माहिती मिळाली. तसेच या सहाजणांमध्ये फोंडा येथील ७० वर्षीय महिला, ८९ वर्षीय मडगाव येथील पुरुष आणि दवर्ली येथील ३९ वर्षीय पुरुष यांचा समावेश असून त्यांचा मृत्यू काल १५ ऑगस्ट रोजी झाला. तसेच मडगाव येथील ६६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू आज झाल्याची माहिती गोवा आरोग्य खात्याने दिली.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ९७ जणांना ठेवण्यात आले आहे. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये एकूण १२७ जण आहेत. १४८२ जनांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत, तर १७३६ जणांचे अहवाल हाती आले आहेत.
दरम्यान, रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले ४ रुग्ण आहेत. डिचोली आरोग्य केंद्रात २३ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ११६ रुग्ण, पेडणे आरोग्य केंद्रात १५५, वाळपई आरोग्य केंद्रात १४९, म्हापसा आरोग्य केंद्रात १३२, पणजी आरोग्य केंद्रात १९३, बेतकी आरोग्य केंद्रात ६६, कांदोळी आरोग्य केंद्रात ८९, कोलवाळे आरोग्य केंद्रात ८८, खोर्ली आरोग्य केंद्रात ९७, चिंबल आरोग्य केंद्रात २५४, पर्वरी आरोग्य केंद्रात १४४, कुडचडे आरोग्य केंद्रात ७४, काणकोण आरोग्य केंद्रात ३४, मडगाव आरोग्य केंद्रात ४२५, वास्को आरोग्य केंद्रात ३८०, लोटली आरोग्य केंद्रात ६२, मेरशी आरोग्य केंद्रात ६४, केपे आरोग्य केंद्रात ७४, शिरोडा आरोग्य केंद्रात ६४, धारबंदोडा आरोग्य केंद्रात १२९, फोंडा आरोग्य केंद्रात १९५ आणि नावेली आरोग्य केंद्रात ६३ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.
गोमेकॉतील कोविड विभागाचे काम पाहणाऱ्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या सहाय्य्क प्राध्यापक डॉ. मरिआ पिंटो यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. डॉ. पिंटो यांनी कोविडच्या लढाईत आपले मोलाचे योगदान आतापर्यंत दिले असून त्यांनी लवकरात लवकर बरे, व्हावे अशी अपेक्षाही मंत्री राणे यांनी व्यक्ती केली आहे.

कोरोना संसर्गस्थळे
पणजी - १९३
म्हापसा - १३२
वास्को - ३८०
मडगाव - ४२५
वास्को - ३८०
चिंबल - २५४

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या