गोव्यातील हतबल कुटूंबाने ओडिशा सरकारला मारली मदतीची हाक...

odia family in goa.jpg
odia family in goa.jpg

मलकनगिरी: सध्या देशभरात कोरोनाचा (COVID 19) प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातच लॉकडाउन (Lockdown) मुळे सामान्य जनतेचे हालही होत आहे. रोजगार नाही कुटुंबाला पोसणार कसे? जगणार कसे? खाणार कसे? असे अनेक प्रश्न लॉकडाउनमुळे सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे त्यातच नोकरी निमित्त स्थलांतर करणाऱ्या रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या कुटुंबाची परिस्थिती त्याहूनही दयनीय आहे.  (Lockdown) गोव्यात लॉकडाउन लावले आहे. अशातच ओडिसा राज्यातील एक दाम्पत्य गोव्यात अडकले आहे त्या कुटुंबाने (couple) घरी परतण्यासाठी ओडिसा सरकारकडे (Government of Odisha) मदतीची मागणी केली आहे. (Odia family who came to Goa for employment is starving due to lockdown)

मिथुन सरकार आणि त्याची पत्नी सरिता कलिमेला शहरात राहत आहेत. परंतु त्यांच्याकडे नोकरी आणि पैसा नसल्यामुळे  त्यांची दयनीय स्थिति झाली आहे. या स्थितीत अडकलेल्या दाम्पत्याकडे जगण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी देखील पैसे नाही. 
 
या जोडप्याला दीड वर्षांचा मुलगा आहे. तसेच मिथुनची बायको सरिता 8 महिन्यांची गरोदर आहे. मिथुन नोकरी शोधण्याकरीता पत्नी आणि मुलासह फेब्रुवारी महिन्यामध्ये गोव्याला आले होते. 17 मार्च रोजी त्याला एका खाजगी कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळाली. या कामाचे त्याला महिन्याला 13,500 रुपये मिळत होते. परंतु, कंपनीने मिथुनला 13 दिवसांचाच पगार देऊन नोकरीवरून काढून टाकले. 

"कंपनीला वारंवार विनंती करूनही मला माझ्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. मी घरभाडे न दिले नाही तर मला आणि माझ्या कुटुंबाला घर सोडावे लागणार. माझ्या जवळचे सर्व पैसे संपले आहे. मी माझ्या मुलाला आणि गर्भवती पत्नीला काय  खाऊ घालू ?" असे म्हणत मिथुनने ओडिशा सरकारकडे मदतीसाठी साद घातली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com