Goa Crime: तो गोव्यात कामासाठी आला अन्‌...

अमलीपदार्थ विकणाऱ्या ओडिसाच्या तरुणाला अटक
Goa Crime shadow
Goa Crime shadowDainik Gomantak

पणजी: राज्यात (Goa) कोविड (Covid-19) पार्श्‍वभूमीवर पर्यटकांचे (Tourism) प्रमाण कमी असले, तरी अंमलीपदार्थाचा व्यापार सुरू आहे व त्यावर पोलिस यंत्रणा कमी पडत आहे. अनेक परप्रांतीय तरुण या व्यवसायात झटपट पैसा मिळवण्याच्या इराद्याने गुंतलेले आहेत. गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने ओरिसाच्या 20 वर्षीय अविजित मृत्यूंजय जना याला बागा - हडपडे येथे मध्यरात्रीनंतर अटक करून त्याच्याकडून 5 लाखांचा गांजा जप्त केला.

Goa Crime shadow
Goa: सिओलीम गावात 2 रशियन महिलांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बागा - हडपडे येथे मारिना दोरादो या हॉटेलजवळ असलेल्या भागात गडद लाल रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची शॉर्टपँट घालून एक तरुण ग्राहकाला अंमलीपदार्थ विक्री करण्यास येणार असल्याने सापळा रचण्यात आला होता. रात्री 1 ते 3 च्या दरम्यान या वर्णनाचा तरुण त्या ठिकाणी आला. ग्राहकाच्या प्रतीक्षेत हा तरुण होता. त्यामुळे त्याला चारही बाजूने घेरून त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्या हातात असलेल्या पॉलिथिन बॅगेची झडती घेण्यात आली. त्यामध्ये गांजासदृश्‍य पदार्थ आढळून आला. त्याने तो ग्राहकाला विकण्यासाठी आणल्याचे चौकशीत सांगितले.

Goa Crime shadow
Goa Murder Case11th Day: पंचनाम्‍याचा घोळ; आक्रोश, हुंदके, मृत्‍यूचे गूढ कायम!

गोव्यात कामासाठी आला अन्‌...

संशयित अविजित जना हा मूळचा ओरिसा येथील असून तो बागा - कळंगुट येथे भाडेपट्टीच्या खोलीत राहत होता. कामानिमित्त गोव्यात आला होता. मात्र, कोविड काळात गोव्यात कामे मिळत नसल्याने तो अंमलीपदार्थ विक्रीकडे आकर्षित झाला होता. यामध्ये पैसाही अधिक मिळाल्याने तो ही विक्री करत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. क्राईम ब्रँचने त्याला न्यायालयाकडून पोलिस कोठडी घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com