Goa Crime: मडगाव रेल्वे स्टेशनवर थरार; पर्यटक तरुणाने कापला स्वतःचाच गळा

भेळपुरीच्या गाडीवर चाकू घेत स्व:ताचा गळा चिरण्याचा केला प्रयत्न
Crime News
Crime NewsDainik Gomantak

मडगाव: ओडिशामधून गोव्यात आलेल्या सरोज भरिया या 28 वर्षीय पर्यटकाने स्वतःचाच गळा चीरण्याचा प्रयत्न आज मडगाव रेल्वे स्थानकाच्या (MADGAON railway station) बाहेर केला. यावळी उपस्थितांनी घडलेला प्रकार पाहून एकच खळबळ उडाली. जखमी पर्यटकाला तातडीने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

(Odisha's Saroj Bharia has tried to cut own throat at Madgaon railway station)

Crime News
Colvale: अवैध गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ओडिशामधून आलेल्या ट्रेनमधून 3 युवक गोव्यात उतरले होते. ट्रेनमधून खाली उतरल्यावर स्टेशन बाहेर असलेल्या एका भेळपुरीच्या गाडीवर ते गेले असता तिघांपैकी असलेल्या सरोजने समोर असलेला चाकू पाहिला अन् पटकन तो चाकू आपल्या हाती घेत कोणाच्याही लक्षात येण्यापूर्वीच आपल्या गळ्यावर चालविला.

Crime News
मामलेदार राहुल देसाई यांच्या नियुक्तीला 'Goa First'चा आक्षेप

काही क्षणात हा युवक रक्तबंबाळ झाल्याचे पाहिल्यावर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जखमीला रुग्णवाहिकेतून इस्पितळात दाखल केले. याबाबत पोलिस तपास सुरु आहे. मात्र अद्याप या युवकाने ही कृती नेमकी कशासाठी केली ते मात्र कळू शकले नाही अशी माहिती मडगाव येथील पोलिस निरिक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली. मात्र जखमी युवकाकडून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु असून याबाबत लवकरच माहिती मिळेल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com