ODP मसुद्यासंबंधी स्थानिक आमदारांसोबत साईटची पाहणी करणार

ODPचा मसुदा तयार असून हा मसुदा मंजुरीसाठी नगरनियोजन बोर्डला पाठविण्यात येणार
ODP मसुद्यासंबंधी स्थानिक आमदारांसोबत साईटची पाहणी करणार
ODP will inspect site with local legislators regarding draftDainik Gomantak

सासष्टी: बाह्य विकास आराखड्यासंबंधी गेल्या वेळीस नागरिकांकडून 65च्या आसपास हरकती आल्याने यंदा दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने (SGPDA) साईटवर जाऊन पाहणी करून ओडीपीचा (ODP) मसुदा तयार असून हा मसुदा मंजुरीसाठी नगरनियोजन बोर्डला पाठविण्यात येणार आहे. परंतु, त्याआधी मडगाव, फातोर्डा आणि फोंडाच्या स्थानिक आमदारांसोबत आज व उद्या साईटची पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे. या ओडीपीच्या मसुद्याला मान्यता मिळाल्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना घेण्यासाठी ओडीपीचा मसुदा दोन महिने खुला ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती एसजीपीडीएचे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा यांनी दिली.

ODP will inspect site with local legislators regarding draft
पेडणे येथील 'रावराजे देशप्रभू' यांच्या इतिहासाची साक्ष देणारा राजवाडा

मडगाव व फोंडा बाह्य विकास आराखड्याच्या मसुद्याचा तयारी करण्यासंबंधी मडगाव येथील दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरण कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई व इतर उपस्थित होते. गेल्या वेळीस स्थानिकांकडून आलेल्या हरकतीमध्ये ओडीपीमध्ये अनेक ठिकाणी रस्ते न दाखविल्याचा जास्त हरकती होत्या. ज्या ठिकाणी रस्ते दाखविण्यात आलेले नाही, त्या साईटवर जाऊन पाहणी करून सर्व त्रुटी दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. हा मसुदा मंजुरीसाठी पाठविण्यापूर्वी स्थानिक आमदारसोबत या साईटची पाहणी करण्यात येणार आहे. आज (15 सप्टेंबर रोजी) मडगाव व फातोर्डा आणि 16 सप्टेंबर रोजी) फोंडयात जाऊन पाहणी करण्यात येणार आहे, असे विल्फ्रेड डिसा यांनी सांगितले.

ODP will inspect site with local legislators regarding draft
गोवा ब्रँड मध निर्माण करून रोजगार निर्मिती करा

बाह्य विकास आराखड्याच्या मसुद्याला मंजुरी मिळाल्यावर हा मसुदा नागरिकांच्या हरकती व सूचना घेण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने खुला ठेवण्यात येणार आहे. मसुद्यामध्ये फातोर्डा परिसरात जीसुडाची असलेली शेतजमीन व्यवसायिक क्षेत्र म्हणून दाखविण्यात आली असून फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी ही संपूर्ण जमीन कृषी क्षेत्र म्हणून दाखविण्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावर जीसुडाचा सल्ला घेण्यात येणार आहे, असे विल्फ़्रेड डिसा यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com