17 लाख देण्याची ऑफर, मासळी मार्केटची साडे पंधरा लाखांची निविदा
Fish MarketDainik gomantak

17 लाख देण्याची ऑफर, मासळी मार्केटची साडे पंधरा लाखांची निविदा

होलसेल मासळी विक्रेता संघटनेचा आरोप, अध्यक्ष बाबाशानच्या माणसालाच कंत्राट

मडगाव : सोपो वसुलीच्या नावे मडगावच्या एसजीपीडीए होलसेल मासळी मार्केटात जी लूटमार चालू होती ती बंद व्हावी यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने (Court) निकाल देऊनही अजून ही लूटमार थांबलेली नाही. आणि या लुटमारीत प्राधिकरणाचे अध्यक्ष बाबाशान डीसा यांचाच हात आहे. असा आरोप होलसेल मासळी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष एम. एम. इब्राहीम यांनी केला.

Fish Market
"काही पक्षांतरे सुशासनाचा आमचा अजेंडा रोखू शकत नाहीत"

या सोपोसाठी आमच्या संघटनेने एसजीपीडीएला दर महिन्याला 17 लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती. असे असताना अध्यक्ष डीसा यांनी आपल्याच मर्जीतील एका कंत्राटदाराला साडे पंधरा लाखाच्या बोलीवर हे कंत्राट दिले आहे. या मार्केटात सोप्याच्या रुपात दर दिवशी किमान दीड लाखांचा निधी जमा होतो. हे पैसे कुणाच्या खिशात जातात याची सरकारने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

एव्हढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करूनही या मासळी मार्केटात (Fish Market) कुठल्याही सुविधा नाहीत. घाण पाणी वाहून जाण्यासाठी सोय नसल्याने येथे चिखलाची दलदल झाली आहे. त्यात किडे वळवळतात आणि अशा घाणीत विक्रेत्याना मासे विकावे लागतात. हे मार्केट आमच्या संघटनेच्या हातात दिल्यास आम्ही त्याची सफाई करू आणि योग्य प्रमाणात स्वच्छता राखू असे इब्राहिम यांनी सांगितले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेला या संघटनेचे अन्य सदस्यही उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com