मुंबईच्या नार्कोटिक्स क्राईम ब्युरोचे गोव्यातील अनेक ठिकाणी छापे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंध

Officers of NCB Mumbai are conducting raids on Miramar Asgaon and Hanjune in Goa
Officers of NCB Mumbai are conducting raids on Miramar Asgaon and Hanjune in Goa

पणजी:  मुंबईच्या नार्कोटिक्स क्राईम ब्युरोने (एनसीबी) काल दुपारपासून गोव्यातील अनेक ठिकाणी छापे टाकून काही स्थानिक व नायजेरियन ड्रग विक्रेत्याना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात डूग्ज साठा जप्त केला आहे. नार्कोटिक्स क्राईम ब्युरोच्या रडारवर असलेल्या एका ड्रग्ज पुरवठादाराला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पुढे अशीच सुरूच राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोव्यातील मिरामार, आसगाव आणि हणजुणे या ठिकाणी एनसीबीने छापे टाकले आहेत.

गोव्यात कालपासून मुंबईच्या नार्कोटिक्स क्राईम ब्रुरोच्या (एनसीबी) पथकाने अनेक ठिकाणी छापे टाकून ड्रग्जप्रकरणी विदेशी तसेच स्थानिकांना अटक केली आहे. मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठाही जप्त केला आहे. अंमलीपदार्थप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीतून एकाचा संबंध चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याशी असल्याचे उघडकीस आले आहे. राजपूत याने गेल्यावर्षी आत्महत्या केल्याप्रकरणी तपास सुरू आहे. सुशांतला ड्रग्स पुरवणाऱ्यालाही गोव्यातून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. या कारवाईची माहिती एनसीबीचे मुंबई व गोवा विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी उघड केली आहे.

दरम्यान अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकानेसुध्दा गोव्यात एक मोहीम राबविली आहे. मागील काही दिवसात मडगावात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तिघांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले आरोपी अट्टल ड्रग्ज दलाल होते. या कारवाईत सुमारे 13.50 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून गोवा राज्यात गांजा या अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यांवरून आढळून येत आहे.

पुढेही काही गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे. त्यातच मुंबईच्या नार्कोटिक्स क्राईम ब्युरोने (एनसीबी) काल दुपारपासून गोव्यातील मिरामार, आसगाव आणि हणजुणे या ठिकाणी छापे टाकून काही स्थानिक व नायजेरियन ड्रग विक्रेत्याना ताब्यात घेतले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com