Mahadayi Water Dispute: अहो, माझ्या जीवनदायिनी मातेला वाचवा ना!

मने जिंकली : सत्तरीतील शिगमोत्सवात म्हादईच्या वेशात चिमुकल्या सावीने दिला संदेश
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

म्हादई प्रश्‍नावरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. यंदाच्या शिगमोत्सवातही त्याचे पडसाद उमटले नाही तरच नवल. परंतु मोठमोठ्या कलाकारांनाही लाजवेल, अशी कलाकारी अवघ्या साडेपाच वर्षांच्या सावी गावस या चिमुकलीने करून दाखवली.

सत्तरी तालुक्यातील शिगमोत्सव मिरवणुकीत तिने म्हादई नदीचा वेश धारण करून व्यासपीठावरून ‘आमची जीवनदायिनी म्हादई वाचवा!’ असा हृदयाला भिडणारा संदेश दिला.

सत्तरी लोकोत्सवांतर्गत झालेल्या शिमगोत्सवात १२ वर्षांखालील वेशभूषा स्पर्धेत मूळ मोर्ले पण सध्या वाळपईत राहणारी सावी सचिन गावस हिने म्हादई बनून आपल्या बोबड्या बोलांतून उपस्थितांची मने जिंकली. अवघ्या तीन वर्षांची असतानाच ती अभिनय कलेकडे वळली. आतापर्यंत वाळपई, साखळी, डिचोली तसेच राज्यातील विविध वेशभूषा स्पर्धांत तिने भाग घेतला.

..आणि अखेर तिला संधी मिळाली

सावीला ‘म्हादई’वर अभिनयासाठी आम्ही तयारी केली होती. साखळी, डिचोलीतील शिगमोत्सवातील स्पर्धा तालुका पातळीवरील असल्याने तिला संधी मिळाली नाही. वाळपईतही तिला संधी मिळणार नव्हती. कारण लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा नव्हती. त्यामुळे आमची निराशा झाली. मात्र आम्ही पुन्हा पुन्हा आयोजकांना विनंती केल्यावर त्यांनी परवानगी दिली आणि सावीने घेतलेल्या परिश्रमाला न्याय मिळाला, असे तिची आई साची म्हणाल्या.

Mahadayi Water Dispute
Goa Traffic Police: एकाच दिवशी 1924 जणांवर गुन्हा; 10.75 लाखांचा दंड

सावी तीन वर्षांची असल्यापासून तिला नृत्य, वेशभूषेची हौस. ती स्वतःच नृत्य करते. आम्ही तिला वेळोवेळी प्रोत्साहन देतो. तिचे रिल्स इंस्टाग्रामवर खूप चालतात. गेल्या वर्षी अखिल गोवा पातळीवरील स्पर्धेत तिला पहिले बक्षीस मिळाले होते. ती कुठल्याही विषयावर धीटपणे बोलू शकते. - साची गावस, सावीची आई.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com