तेलगोळ्यांमुळे सासष्टी किनारपट्टी काळवंडली; सागरी जीवसृष्टी धोक्यात

दैनिक गोमंतक
सोमवार, 10 मे 2021

 पावसाळा जवळ आल्याने दरवर्षीप्रमाणे सासष्टीच्या किनारपट्टीवर तेलगोळे जमा झाले असून येथील किनारपट्टी काळवंडली आहे.

मडगाव :  पावसाळा जवळ आल्याने दरवर्षीप्रमाणे सासष्टीच्या किनारपट्टीवर तेलगोळे जमा झाले असून येथील किनारपट्टी काळवंडली आहे. मात्र त्यामुळे सागरी जीवसृष्टीस धोका निर्माण झाल्याने निसर्गप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.  (Oil spills blackened the Sassati coast;  Endangered marine life) 

नागरिकांनी सहकार्य केल्यास 8 दिवसांत मृत्यूदर कमी होईल; प्रमोद सावंतांचे आवाहन

गेल्या अनेक वर्षापासून हा नेहमीचा प्रकार घडत असून हे तेल गोळे जमा करणे, त्यांची विल्हेवाट लावणे ही किनारपट्टींतील पंचायतींसाठी एक डोके दुखी ठरू लागली आहे. पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून हे तेल गोळे हटविण्याच्या सूचना द्याव्यात, अशी विनंती केली आहे. त्यात केळशी बायोडायव्हसिर्टी मंडळाचे अध्यक्ष डिक्सन वाज यांचाही समावेश आहे.

गोव्यात ''या'' ठिकाणी मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्शन

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पावसाळा जवळ आला, की समुद्रात खोलवर व्यापक प्रमाणात घुसळण्याची प्रक्रिया सुरु होते. त्या प्रक्रियेत सागरगामी बोटी तसेच अन्य नौकांनी समुद्रात ज्या वस्तू व द्रव्ये फेकलेली असतात, ती पाण्याबाहेर येतात. समुद्राच्या कडेला येऊन पडतात. त्यात पाण्यात सोडलेल्या तेलाच्या गोळ्यांचा अंतर्भाव असतो. ते काळपट बनतात. त्यामुळे किनारपट्टी काळवंडते.

सासष्टीच्या बेतूल ते वारका, कोलवा, बेताळभाटी पर्यतच्या किनारपट्टीवर असे असंख्य तेलगोळे सांचलेले सध्या आढळून येत आहेत. या तेल गोळ्यांमुळे या पूर्वी पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला होता. पण यंदा जरी कोविड संसर्गामुळे पर्यटकांची संख्या घटलेली असली, तरी या गोळ्यांमुळे किनारपट्टी काळवंडली आहे.

संबंधित बातम्या