ओजस्वीनीच्या कामगिरीमुळे राज्याच्या शिरपेचात 'मानाचा तुरा'

ओजस्वी सतीश फळदेसाईचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
MLA Yuri Alemao
MLA Yuri AlemaoDainik Gomantak

Cuncolim: ओजस्वी सतीश फळदेसाई (Ojaswi Satish Phaldesai) या प्रतिभावान मुलीने विविध स्पर्धांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून पालकांसह गोव्याला अभिमान वाटावा, अशी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

ओजस्वीने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’ प्रवेश चाचणी परीक्षेत 685 गुण मिळविले. ओजस्वीने अखिल भारतीय स्तरावर ‘नीट’मध्ये 480 वा क्रमांक मिळवला आहे. प्रगत पब्लिक स्कूल, द्वारका-दिल्ली येथे इयत्ता बारावीत विज्ञान शाखेत 97.2 टक्के गुण मिळवून ती प्रथम आली.

MLA Yuri Alemao
Sanguem: सांगे आयआयटी प्रकल्प परिसरात 144 कलम लागू

ओजस्वीने लहानपणापासूनच अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि आपल्यातील कलागुण दाखवत नावलौकिक मिळवला. तिला दिल्लीतील प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. ती दिवंगत डॉ. सतीश फळदेसाई आणि काणकोणच्या मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तनुजा फळदेसाई यांची कन्या आहे. कुंकळ्ळी नागरिक समिती, कुंकळ्ळी- बाळ्ळी गणेशोत्सव मंडळ, कुंकळ्ळी क्षत्रिय मराठा समाज व इतर सामाजिक संघटनांनी तिचे कौतुक केले आहे.

MLA Yuri Alemao
Western Ghat : पश्‍चिम घाट संवेदनशील अधिसूचनेविरोधी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

युरींनी दिल्या शुभेच्छा: शैक्षणिक स्पर्धांमध्ये गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी ओजस्वीचे अभिनंदन केले. ओजस्वीची शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी अभिमानास्पद आहे. तिच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा. ती वडिलांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वैद्यकशास्त्रात नावलौकिक मिळवेल, असे युरी यावेळी म्हणाले.

MLA Yuri Alemao
Breaking News|काँग्रेसला गोव्यात मोठं खिंडार; 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

ओजस्वीनीच्या यशाचा आलेख

* ‘नीट’मध्ये राष्ट्रीय स्तरावर 480 वा क्रमांक.

* जेईई प्रवेश परीक्षेत 99.46 टक्के गुण.

* ‘नासा’तर्फे कल्पना चावला राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड.

* किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या स्पर्धा परीक्षेत 39 वा क्रमांक.

* राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा आणि राष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये गुणवंत प्रमाणपत्र.

क्रीडा स्पर्धांतही सरस: पट्टाया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅन पॅसिफिक स्पर्धेत ती चॅम्पियन ठरली होती. 2016 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी विज्ञान मंथनमध्ये ती तिसरी आली. तिने विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला असून आंतरशालेय उपक्रमांमध्ये बक्षिसे पटकावली आहेत. ओजस्वीला बुद्धिबळ आणि बॅडमिंटन खेळायला आवडते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com