कुंभेगाळ-पैंगीणमध्ये भेंडीची लागवड

सुभाष महाले
शुक्रवार, 31 जुलै 2020

कष्ट करण्याची इच्छा असेल त्याला वाट सापडत असते. करोना महामारीमुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. परदेशात काम करणारे घरी आल्यानंतर त्यांना पुन्हा प्रदेशात जाण्यासाठी मिळाले नाही, अशा प्रसंगी पुढे काय? हा प्रश्न या युवकांसमोर होता. त्यांपैकी काणकोण मधील काही युवकांनी हार न मानता आपल्या पारंपरिक शेती व्यवसायाला आपलेसे केले.

काणकोण

परदेशात काम करून आलेल्या कुंभेगाळ पैंगीण येथील महेश भगत यांनी परदेशात काम केल्यानंतर करोना महामारीमुळे परदेशाची वाट बंद झाल्याने यंदा शेतीची कास धरली आहे. आपले मित्र उमेश सादोळशेकर याच्या साथीने तयांनी २.५ एकर शेत जमिनीत भेंडीची लागवड केली आहे. वडिलोपार्जीत शेतजमिनीत यंदा लॉकडाऊनच्या काळात त्यांनी बेकारीवर मात करण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला आहे. काजरी, जेके ६२ या वाणाच्या भेंडीची लागवड त्यानी केली आहे.
सध्या भेंडीच्या रोपट्याना फुले धरू लागली आहेत. पंधरवड्यात भेंडी तयार होणार आहेत. भेंडी शेतीला तारेचे कुंपण घालण्यासाठी, मशागत व बियाण्यांसाठी कृषी खात्याचे अनुदान प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. युवा शेतकरी प्रसाद वेळीप यांच्याकडून प्रोत्साहन घेऊन शेती व्यवसायात उतरल्याचे भगत यांनी सांगितले. कृषी खात्याचे काणकोण मधील विभागीय कृषी अधिकारी याचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याने या व्यवसायात सध्या कोणत्याच अडचणी येत नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

संपादकन ः संजय घुग्रेटकर

संबंधित बातम्या