Goa: "राज्यात आणीबाणी घोषित करायलाच हवी"   

olcinyo simoyas has demanded that a state of emergency be declared in the state.
olcinyo simoyas has demanded that a state of emergency be declared in the state.

                                                                                                  सासष्टी: गोवा सरकार (Government of Goa) कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यास पूर्णपणे असफल ठरल्याने राज्यात आज कोरोना (Covid19 ) संक्रमित व कोरोनामुळे होणारी मृत्यू संख्या वाढत आहे. युनायटेड स्टेट्स, स्पेन, इटली यांसारख्या देशांनी आणीबाणी घोषित केल्याने या देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर लक्ष केंद्रित करून राज्यात आणीबाणी घोषित करावी, अशी मागणी गोंयचो रापणकाराचो एकवट (Goenchea Ramponkarancho Ekvott) संघटनेचे सरचिटणीस ओलन्सियो सीमोयस (olcinyo simoyas) यांनी केली. (olcinyo simoyas has demanded that a state of emergency be declared in the state)

संपूर्ण देशात कोरोनाची स्थिती नियंत्रणास येण्यास सुरवात झाली असून संपूर्ण विश्वात पर्यटन स्थळ म्हणून पाहण्यात येणाऱ्या गोवा राज्यात मात्र कोरोना दिवसेंदिवस फोफावत चाललेला आहे. राज्यात ऑक्सिजनअभावी अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. राज्यातील आरोग्य सेवा कोलमडून गेलेली आहे.कोरोना संक्रमित रुग्णांना आज इस्पितळात बेड्स तसेच ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून गोवा सरकारने या समस्येचे त्वरित निवारण करणे गरजेचे आहे, असे ओलन्सियो सीमोयस यांनी सांगितले. 

कोरोनाची पहिली लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक विध्वंसक असून गेल्या वर्षी सरकारने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत हॉटेल्समध्ये कोरोनाबाधित रुग्णांना राहण्याची सोय केली होती. तर, यंदाही सरकारने रुग्णांना क्वारंटाईन होण्यासाठी हॉटेल्स व रिसॉर्टमध्ये भरती करणे आवश्यक आहे. होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना घरी आरोग्य सेवा मिळत नसून काही होम क्वारंटाईन असलेले रुग्ण फिरत असल्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये वाढ होत आहे, असे ओलन्सियो सीमोयस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com