काणकोणात जून्या इमारतीची रंगरंगोटी

Dainik Gomantak
बुधवार, 20 मे 2020

नव्या आरोग्य केंद्र इमारतीत रूग्णाची संख्या वाढल्याने सकाळी सामाजिक अंतर राखणे कठीण बनते त्यासाठी जुन्या इमारतीचे दोन खोल्या व्हरांडा वापरला जाणार आहे

काणकोण

काणकोणमधील पोर्तूगीजकालीन काणकोण प्राथमीक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीची  १६ वर्षानी कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर  रंगरंगोटी करण्यात येत आहे. काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रासाठी नवीन अद्यावत इमारत उभारण्यापूर्वी या इमारतीचा आरोग्य केंद्र म्हणून वापर करण्यात येत होता. या इमारतीत ताप,खोकला व करोना सदश्य लक्षणे दिसणाऱ्या रूग्णासाठी वेगळी ओपीडी व फार्मसी सुरू करण्यात येणार आहे. नव्या आरोग्य केंद्र इमारतीत रूग्णाची संख्या वाढल्याने सकाळी सामाजिक अंतर राखणे कठीण बनते त्यासाठी जुन्या इमारतीचे दोन खोल्या व्हरांडा वापरला जाणार आहे.या खोलीत बाह्य रूग्ण तपासणी व व्हरांड्यावर रूग्णासाठी सामाजिक अंतर राखून  बसण्याची सोय करण्यात येणार आहे.पावसाळ्यात रूग्णाना त्रास होऊ नये यासाठी ही प्रमुख्याने व्यवस्था करण्यात येत आहे असे काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ.वंदना देसाई यांनी सांगितले. जुन्या इमारतीचा काही भाग वैद्यकीय कचरा व अन्य अडगळीतील सामान साठवून ठेवण्यासाठी करण्यात येत आहे.

पोर्तुगीज कालांत सैनिकाच्या.निवासासाठी या इमारतीची उभारणी करण्यात आली होती.मात्र देखभाली अभावी या इमारतीच्या छप्पराचे पत्रे फुटले आहेत.काही ठिकाणी भिंतीवर झाडे वाढल्याने भिंंती तुटल्या आहेत.

राष्ट्रीय स्वंय संघाच्या काणकोण मधील स्वयंसेवकानी या पोर्तुगीज कालीन जुन्या आरोग्य केंद्राच्या इमारतीची स्वच्छता केली.सोळा वर्षापूर्वी याच इमारतीचा उपयोग काणकोण प्राथमीक आरोग्य केंद्र म्हणून करण्यात येत होता.या इमारतीला लागूनच प्रसुती कक्ष विभागासाठी नवीन इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.सोळा वर्षापासून नवीन अद्यावत काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत उभारल्यानंतर या इमारतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. डॉ.दिवाकर वेळीप याच्या पुढारपणाखाली या इमारतीची स्वच्छता करण्यात आली.

 

 

संबंधित बातम्या