Viral Video : ओव्हरटेक केल्याचा राग; वृद्ध व्यक्तीने भररस्त्यात हातोड्याने कारच फोडली

पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु केली आहे.
Accident in Goa
Accident in GoaDainik Gomantak

Viral Video : गोव्यात सध्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच बेशिस्त पर्यटकांमुळे अपघातांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. अशाच प्रकारची एक घटना आज पर्वरी परिसरात पाहायला मिळाली. पर्यटकांच्या कारने ओव्हरटेक केल्याच्या रागातून एका वृद्ध व्यक्तीने भररस्त्यात एक कारच फोडली आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु केली आहे.

हल्ला झालेली कार ही रेंट अ कार असल्याचं समोर आलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. पर्यटक गोव्यात आल्यानंतर बाईक किंवा कार भाड्याने घेत असतात. अशाच पर्यटकांनी ही कार फिरण्यासाठी भाड्याने घेतली होती. ज्यावेळी या कारने दुचाकीला ओव्हरटेक केलं त्यावेळी दुचाकीस्वाराचा संताप अनावर झाला. त्याने पर्वरीमध्येच कारचा पाठलाग करुन पर्यटकांना गाठलं आणि त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पर्यटकांशी वाद घालत असतानाच संतापलेल्या या दुचाकीस्वाराने हातोडा घेत आधी कारच्या सर्व काचा फोडल्या.

Accident in Goa
IFFI Golden Peacock : यंदाच्या इफ्फीत कुणाला मिळणार 'गोल्डन पिकॉक'?

भररस्त्यात कारसमोर दुचाकी लावत कार अडवून या व्यक्तीने हल्ला चढवला. काचा फोडून हा व्यक्ती थांबला नाही, तर त्याने बोनेटसह दरवाज्यावरही हातोड्याच्या साहाय्याने हल्ला केला. यात सुदैवाने कारमधील कुणालाही इजा झाल्याची माहिती नाही. मात्र कारचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. पर्वरीत भररस्त्यात सुरु असलेल्या या थरारनाट्यामुळे काहीकाळ वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com