Panjim : नैराश्‍यातून वृद्धाची मांडवी पुलावरून आत्महत्या!

आजारपण आणि नैराश्यातून मांडवी नदीत उडी घेतल्याचा पोलिसांचा अंदाज
Mandovi Bridge
Mandovi BridgeDainik Gomantak

Panjim : बोक-द-व्हाक येथील तुळशीदास शेटये (68) या वृद्धाने आजार व नैराश्‍यातून आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मांडवी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या स्कुटरवरून त्याची ओळख पटविली आहे. घटनेनंतर पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीपात्रात शोध घेतला. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. मात्र, त्याला पुलावरून उडी मारताना एका व्यक्तीने पाहिले आहे. (Latest Panaji News)

रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह सापडला नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवी नदीवरील जुन्या पुलावर एक स्कुटर उभी केल्याची माहिती सकाळी 8 वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला आली. त्यामुळे पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्कुटर ताब्यात घेऊन त्या क्रमांकावरून शेट्ये यांची माहिती मिळवली.

Mandovi Bridge
CM Pramod Sawant : गोवा सरकार एक पाऊल मागे

त्यामुळे घेतली टोकाची भूमिका

तुळशीदास शेटये हे येथील श्री महालक्ष्मी मंदिरात काम करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना अपघात होऊन पायाला मार लागला होता. ते कौटुंबिक परिस्थिती व आजाराला कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com