ऑलिव्ह रिडले कासव सापडला आगोंद किनाऱ्यावर मृतावस्थेत

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

, या कासवाचा मृत्यू कसा झाला हे गूढ कायम आहे.

काणकोण

आगोंद किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासव मृतावस्थेत सापडला. हा किनारा सागरी कासवासाठी आरक्षित आहे. आतापर्यंत सुमारे दोन हजार कासवांची पिल्ले येथून समुद्रात सोडण्यात आली आहेत. मात्र, या कासवाचा मृत्यू कसा झाला हे गूढ कायम आहे. वनाधिकाऱ्यांनी मृतावस्थेत सापडलेल्या कासवाचा पंचनामा करून त्याला दफन केले.
काही दिवसापूर्वी आगोंद किनाऱ्यावर २१ मे रोजी समुद्राच्या लाटांबरोबर वाहत आलेला अडीच मीटर लांबीचा मेलेला डॉल्फिन मासा सापडला होता. गेल्यावर्षीही याच किनाऱ्यावर असाच मेलेल्या अवस्थेत डॉल्फिन सापडला होता. आगोंद किनारा सागरी कासवांसाठी प्रसिद्ध आहे.

 

संबंधित बातम्या