Olive Ridley Turtle: कासव आले खरे पण अंडी न घालताच माघारी परतले; विश्वजीत राणेंनी दिला गंभीर ईशारा

आश्वे मांद्रे येथील सागरी किनारी कासव अंडी घालण्यासाठी आले होते
Olive Ridley Turtle
Olive Ridley TurtleDainik Gomantak

Olive Ridley Turtle: आश्वे मांद्रे येथील सागरी किनारी शुक्रवारी दुपारी दोनच्या दरम्यान एक सागरी कासव अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर आली होती. परंतु तिच्याजवळ पर्यटक आणि नागरिकांचा गोंधळ, मोठ्या आवाजामुळे अखेर सागरी कासव अंडी न घालताच समुद्रात माघारी फिरली. त्यामुळे पर्यावरण प्रेमी तर्फे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Olive Ridley Turtle
Mormugao Crime : धक्कादायक ! 24 वर्षीय युवकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

सागरी कासवांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी वन्य विभागामार्फत 1999 ते आज पर्यंत मोरजी किनारी भागात कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. त्याचाच एक भाग म्हणून हल्ली आश्वे मांद्रे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सागरी कासव येऊ लागले आहे. यापूर्वी दोन सागरी कासवांनी आश्वे येथे अंडी घातली तर मोरजी येथे एका सागरी कासवाने अंडी घातलेली आहेत.

शुक्रवार दिनांक 13 रोजी दुपारी दोनच्या दरम्यान आश्वे मांद्रे किनाऱ्यावर एक सागरी कासव अंडी घालण्यासाठी आली होती. वाळूमध्ये खड्डा खणत असताना काही पर्यटक आणि नागरिकांनी या ठिकाणी गोंधळाचे वातावरण तयार केल्याने सागरी कासवाने अंडी न घालता थेट माघारी समुद्रात परतली.

Olive Ridley Turtle
Mahadayi Water Dispute : अमित शहांनी गोव्याला फक्त 15 मिनिटं दिली; म्हादईप्रश्नी मनोज परबांनी सरकारला घेरलं

दरम्यान, वन मंत्री विश्वजित राणे यांनी ऑलिव्ह रिडले कासवाला त्रास दिल्याच्या या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची पाहणी करण्यासाठी वनविभागाची टीम पाठवण्यात आली असून त्यानुसार कार्यवाही सुरू केली जाईल असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com