गोव्यात धोक्याची घंटा; 8 वर्षाचा मुलगा ओमिक्रॉन बाधित!

आम्ही प्रोटोकॉलनुसार लवकरच पावले उचलू: विश्वजित राणे
Omicron Case In Goa

Omicron Case In Goa

Dainik Gomantak 

Goa: ब्रिटनमधून 17 डिसेंबर रोजी गोव्यात (Omicron Case In Goa) दाखल झालेल्या 8 वर्षीय मुलाचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज 27 डिसेंबर रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह (Omicron Positive) आला आहे. त्यामुळे गोवा राज्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

<div class="paragraphs"><p>Omicron Case In Goa</p></div>
दिगंबर कामत करणार आजपासून प्रचाराला सुरूवात...

ओमिक्रॉनचा (Omicron Variant) धसका घेतलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने प्रतिबंधात्मक पावलं उचलली आहेत, चाचण्यांमध्ये वाढ करत असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून नाईट कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. मात्र पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा (Goa) राज्याने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे गोवा सरकार (Goa Government) निर्बंध लागू करण्यासाठी कुणाची वाट पाहतंय असा सवालही विचारला जात आहे.

गोव्यात सध्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनला कंटाळलेल्या देशी-परदेशी पर्यटकांची पावलं आता गोव्याकडे वळू लागली आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यातील सर्वच किनाऱ्यांवर (Goa Beach) पर्यटकांची (Goa Tourism) गर्दी वाढली आहे. राज्यातील सर्वच ह़ॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत. मात्र गोव्यात दाखल होणारे पर्यटक कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचं चित्र आहे.

आम्ही प्रोटोकॉलनुसार लवकरच पावले उचलू: विश्वजित राणे (Vishwajit Rane)

राज्यात ओमिक्रॉनचे पहिले प्रकरण आढळल्यानंतर, राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले, 'आम्ही प्रोटोकॉलनुसार लवकरच पावले उचलू. गोवा सरकार जनहितासाठी कोणतेही कठोर पाऊल उचलेल. यावर आम्ही लवकरच तोडगा काढू.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com