क्रांती दिनानिमित्त प्रत्येकाने स्फुर्ती घेणे आवश्यक: मंत्री गुदिन्हो

लोहिया मैदानावर क्रांतिदिन सोहळा साजरा
क्रांती दिनानिमित्त प्रत्येकाने स्फुर्ती घेणे आवश्यक: मंत्री गुदिन्हो
Goa Revolution Day Dainik Gomantak

सासष्टी : गोवा मुक्तिसंग्राचा इतिहास आजच्या विद्यार्थ्यांना व युवा पिढीला सांगणे सांगणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यसैनिकांना निःस्वार्थी सेवा केली. गोव्याला पोर्तुगिजांच्या जोखंडातून मुक्त केले. त्यांचा आदर्श आपण डोळ्यांसमोर ठेवणे गरजेचे आहे. युवकांनी त्यांचे विचार आणि आदर्श आत्मसात करावे, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

सरकारी पातळीवरील दक्षिण गोव्यातील क्रांतिदिनाचा कार्यक्रम सौंदर्यीकरण केलेल्या ऐतिहासिक डॉ. लोहिया मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना पंचायत मंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते.

Goa Revolution Day
तुये येथे दुचाकीस्‍वारावर बिबट्याचा हल्ला

ते पुढे म्हणाले, सध्या समाजात नकारात्मकता वाढली असून देशाचा, राज्याचा विकास साधण्यासाठी क्रांतिदिनासारखे कार्यक्रम प्रेरणादायी ठरतात, अशा सोहळ्यातून स्फूर्ती मिळते. देश व गोवा सांभाळण्यासाठी त्याग करण्याची भावना प्रत्येकाने बाळगली पाहिजे. गोव्याचा विकास करताना लोकांनी विरोधासाठी विरोध करू नये.

स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल पै यांनी सूत्रसंचालन केले. गुदिन्हो यांनी डॉ. लोहिया यांना आंदराजली वाहिली.आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, जिल्हाधिकारी ज्योती कुमारी, पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दामोदर विद्यालय. रवीन्द्र केळेकर ज्ञान मंदिर, महिला व नूतन इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते सादर केली. त्यानंतर संध्याकाळी 18 जून क्रांतिदिन समितीतर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, चित्रकला व देशभक्ती गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com