Onam festival: सांस्कृतिक कार्यक्रमांसह डिचोलीत ओणम उत्साहात

केरळ राज्यातील लोक कष्ट करणारे तेवढेच अत्यंत विश्वासू - डॉ. चंद्रकांत शेट्ये
Onam festival
Onam festivalDainik Gomantak

डिचोली: केरळ राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या विकास प्रक्रियेत मोठे योगदान असणारे राज्य आहे. गोवा आणि केरळमधील संस्कृतीतही साम्य आहे, असे प्रतिपादन मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी केले. कल्पका कल्चरल असोसिएशनतर्फे रविवारी डिचोलीत आयोजित ओणम महोत्सवात मंत्री हळर्णकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. सांस्कृतिक कार्यक्रमांतून एकतेची प्रचिती येत असते, असे हळर्णकर यांनी सांगून ही एकता अशीच टिकून रहावी, असे आवाहन केले.

(Onam festival celebrated at Bicholim with cultural programs)

Onam festival
MLA Viresh Borkar: फुटीर आमदारांविरोधात रिव्हॉल्युशनरी गोवन्स आक्रमक

बोर्डे येथील श्री महामाया सभागृहात पार पडलेल्या या महोत्सवाला विशेष अतिथी म्हणून आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. अन्य मान्यवरांत डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, गोवा मल्ल्याळम महासंघाचे अध्यक्ष वासू नायर, कल्पका कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष पी. व्ही. जयप्रकाश, सचिव प्रसाद नायर आणि पी. व्ही. शिवकुमार यांचा समावेश होता.

यावेळी महाबलीची वेशभूषा केलेले जेम्स एम. अँथनी यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्वप्रथम महोत्सवाचे वैशिष्ट्य असलेल्या राजा महाबली समवेत वाजतगाजत मान्यवरांचे महोत्सव ठिकाणी आगमन झाले. स्वागत पी. व्ही. जयप्रकाश यांनी केले. प्रसाद नायर यांनी कल्पका असोसिएशनचा अहवाल सादर केला. पी. व्ही. शिवकुमार यांनी आभार मानले.

Onam festival
Congress MLA: बंडखोर निघाले दिल्लीश्वराच्या दर्शनाला

केरळमधील लोक प्रामाणिक: डॉ. चंद्रकांत शेट्ये

केरळ राज्यातील लोक कष्ट करणारे तेवढेच अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक आहेत, असे गोरवोद्‍गार आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी यावेळी काढले. ओणम महोत्सवातून केरळ बांधवांच्या संस्कृती आणि एकतेचे दर्शन घडत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी तमीळ भाषेतूनही संभाषण करून उपस्थितांना अचंबित केले.

विजेत्यांचा गौरव

या महोत्सवानिमित्त घेतलेल्या फुलांची रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शिक्षण आदी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या महोत्सवानिमित्त केरळ राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. फुलांच्या आकर्षक रांगोळ्याही घातल्या होत्या. कोविडमुळे दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा साजऱ्या झालेल्या या महोत्सवाला केरळ बांधवांसह अन्य लोकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com