कळंगुट वेश्या प्रकरणात परप्रांतीय तरुणांच्या पुन्हा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

गुरुवारी घातलेल्या छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा स्थानिक पोलिसांनी डॉल्फीन सर्कल, कळंगुटात वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तरुणीसोबत तिघा परप्रांतीय तरुणांच्या मुसक्या आवळल्या.

शिवोली: कळंगुटात क्राईम ब्रांचकडून गुरुवारी घातलेल्या छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा स्थानिक पोलिसांनी डॉल्फीन सर्कल, कळंगुटात वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तरुणीसोबत तिघा परप्रांतीय तरुणांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी दिली.

या प्रकरणात सहभागी तरुणीची सरकारी आश्रमगृहात रवानगी करण्यात आली आहे. कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अकबर अली (34- कारगील, लड्डाख) प्रणा जेना (40वर्षे, ओडिशा) तसेच नेहा खतुन (24 वर्षे, कोलकाता) या भागात खुलेआम वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरवत असल्याची कुणकुण लागल्याने पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ तसेच त्यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने संशयित तरुणांशी संपर्क साधला असता त्यांनी तरुणी पुरविण्याचे मान्य केले. शुक्रवारी सकाळी संशयित दलाल ठरल्यानुसार, एका आलिशान कारगाडीने डॉल्फीन सर्कल परिसरात पोहोचला असता परिसरात आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. यावेळी वेश्या व्यवसायात सहभागी तरुणीची पोलिसांकडून सुटका करण्यात आली.

गोव्यात कळंगुटच्या हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

दरम्यान, ताब्यातील तिघाही संशयित तरुणांविरोधात भारतीय दंड संहिता 370 कलम 4, 5 आणि 7 नुसार कळंगुट पोलिसांकडून रितसर गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक केली. या कारवाईत कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ तसेच महिला पोलिस निरीक्षक प्रगती मळीक, हवालदार देवीदास हळदणकर, कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, दिनेश मोरजकर, महिला कॉन्स्टेबल दिपीका नाईक, वाहन चालक सर्वेश तुयेंकर, सुनील म्हाळशेंकर, तसेच स्वयंसेवी संस्थेच्या एन्ड्रीया परैरा यांनी भाग घेतला. कळंगुटमध्ये वेश्याव्यवसायाचे सत्र सुरूच.

धोक्याची घंटा! तरी गोवा सरकार सुस्त राज्यात कोरोना रुग्णांत दुप्पटीने वाढ 

संबंधित बातम्या