मागण्या मान्य झाल्यानंतर निवासी डॉक्टर कामावर रुजू

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

व्यवस्थापनाने सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगत निवासी डॉक्टर पुन्हा कोविड इस्पितळात कामावर रुजू झाले. काम बंद केल्यावरच या डॉक्टरांच्या मागण्यांचा विचार करण्यात आल्याचे दिवसभरातील घटनाक्रमावरून दिसून आले.

पणजी : इएसआय आणि दक्षिण गोवा कोरोना इस्पितळ मडगाव येथे काम करणारे निवासी डॉक्टरांच्या राहण्याच्या जागा खाली करण्याची सूचना दिल्याने त्यांनी काम बंद केले होते. ते त्यांच्या जुन्या पदांवर गोमेकॉत हजर झाले होते. मात्र, व्यवस्थापनाने सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगत निवासी डॉक्टर पुन्हा कोविड इस्पितळात कामावर रुजू झाले. काम बंद केल्यावरच या डॉक्टरांच्या मागण्यांचा विचार करण्यात आल्याचे दिवसभरातील घटनाक्रमावरून दिसून आले.

आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून आम्हाला पूर्ववत राहिवासाची सेवा उपलब्ध करून दिली आहे. आम्ही पुन्हा गोवेकरांच्या सेवेसाठी दाखल होत आहे. मात्र कोरोना सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांच्या बाबतीीीतत पुन्हा असा प्रश्न निर्माण होऊ नये अशी मागणीही निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रतीक सावंत यांनी केली.

मडगाव ईएसआय आणि दक्षिण जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाबतचे उपचार करणाऱ्या शासकीय राहिवासाची सोय केलेल्या खोल्या रिकाम्या करण्यासाठी सांगितल्या होत्या.आम्ही जर हे काम करणार असू तर पूर्वीप्रमाणे दिलेल्या ठिकाणीच राहून काम करू, अशी भूमिका या डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांपासून घेतली होती. त्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीसुद्धा त्यांचा प्रश्न सोडविणार असल्याची शास्वती दिली होती, मात्र दोन दिवस हा प्रश्न सुटला खितपत पडला होता. जेव्हा या डॉक्टरांनी कोरोना इस्पितळातील काम थंबीविले तेंव्हाच या प्रश्नावर तोडगा निघाला.

संबंधित बातम्या