फोंड्यात पेट्रोलपंपावर धिंगाणा घालणाऱ्या युवकाला अटक

फोंड्यात पेट्रोलपंपावर धिंगाणा घालणाऱ्या युवकाला अटक
ARRESTED.jpg

फोंडा: फोंडा शहर (Ponda City) परिसरात मंगळवारी संध्याकाळी मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या युवकाला फोंडा पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. संशयित युवकाचे नाव रूपेश नाईक असे असून धिंगाणा घातल्याबद्दल त्याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (One arrested in assault case at Fonda petrol pump)

मंगळवारी सांयकाळी फोंड्यातील  कवळेकर पेट्रोलपंपावर (Petrol Pump) दुचाकी घेऊन पेट्रोल घालण्यासाठी गेलेल्या रूपेश व पेट्रोल भरणाऱ्या कामगारात बाचाबाची झाली. यावेळी रूपेश नाईक याने कामगारावर हात टाकून त्याला मारहाण केली व शर्ट फाडला, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी फोंडा पोलिसांत रूपेश नाईक विरोधात तक्रार केल्यानंतर त्याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, संशयित युवक ‘आरजीशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आरजीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. फोंडा पोलिसांनी 448,323,506-दोन, 504 कलमाखाली अटक करण्यात आली असून, यासंबंधी अधिक चौकशी चालू आहे.

फोंड्यातील धिंगाणा प्रकरणात आरजीचा संबंध नाही

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या युवकांबरोबर रेव्होल्युशनरी गोवन (Revolutionary goan) संघटनेचा कोणताही संबंध नसल्याची माहिती रेव्होल्युशनरी गोवन्सचे कार्यकर्ते विश्‍वेश नाईक यांनी आज (बुधवारी) सकाळी फोंडा पोलिस स्थानकासमोर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रेव्होल्युशनरी गोवन्सचे गौरेश गावकर, रोहन नाईक, प्रेमानंद नाईक, प्रेमानंद गावडे, विराज नाईक आदी उपस्थित होते.

विश्‍वेष नाईक यांनी सांगितले की, मंगळवारी एक व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाला आहे. यासंबंधी चौकशी चालू असल्याचे फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षकांनी सांगितले. विश्‍वेश नाईक व इतरांनी यावेळी पत्रकारांना सांगितले की, रेव्होल्युशनरी संघटनेला चार वर्षे झाली असून, अजूनपर्यंत कुठल्याही हिंसक कारवायांमध्ये आमचा सहभाग नाही. या प्रकरणात वापरण्यात आलेला आरजी शब्दाचा अर्थ काहीही होऊ शकतो. 

तक्रार केलेला युवक रिव्होल्युशनरी गोवन्स संघटनेचा सदस्यसुध्दा नसल्याची माहिती नाईक यांनी दिली. आरजीचे नाव बदनाम होऊ नये यासाठी हे स्पष्टीकरण असल्याचे यावेळी रेव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com