नऊ लाखांचे दागिने विकल्याप्रकरणी एकाला अटक

dainik gomantak
गुरुवार, 16 जुलै 2020

दरम्यान, शेठ लक्ष्मण नागवेकर हे या प्रकरणात गुंतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली होती. पण, नंतर त्याची जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

सासष्टी,

कोलवा येथील भाडेपट्टीवर राहणाऱ्या महिलेने मालकाकडून उसणे घेतलेले नऊ लाख रुपयांचे दागिने परस्पर विकल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी भादंसंच्या ४२० कलमाखाली सोफिया मुल्ला हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. पोलिस रिमांडसाठी संशयित महिलेला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा मारिया फर्नांडिस (वय ६२, रा. कोलवा) यांनी तक्रार नोंद केल्यावर हा प्रकार संशयित महिलेने मालक मारिया फर्नांडिस यांच्याकडून आपल्या काही कामास्तव सुमारे ९ लाख रुपयांचे दागिने उसणे घेतले होते. सदर महिलेने हे दागिने आपले काम झाल्यावर परत करण्याऐवजी परस्पर विकले. मारियाला याची माहिती मिळाल्यानंतर तिने त्वरित कोलवा पोलिस स्थानकात धाव घेऊन तक्रार नोंद केली.
कोलवा पोलिसांनी आज बुधवारी संशयित महिलेला अटक करून तिच्यावर गुन्हा नोंद केला. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, शेठ लक्ष्मण नागवेकर हे या प्रकरणात गुंतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली होती. पण, नंतर त्याची जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

संबंधित बातम्या