Goa Accident : राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यु तर एक गंभीर जखमी

खांडोळा-आमोणा पुलाजवळ आणि सुकतळी-मोले येथे महामार्गावर घडला अपघात
accident
accidentDainik Gomantak

Goa Accident : सुकतळी-मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर ईनोव्हा कार व दुचाकी यांच्यात धडक झाल्याने अपघात झाला. हा अपघात आज सकाळी 10 च्या सुमारास घडला. या अपघातात एकाचा मृत्यु झाला आहे. अशीच एक अपघाताची घटना खांडोळा - आमोणा पुलाजवळ संध्याकाळी घडली. कार व दुचाकीच्या धडक झाल्याने अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिस पुढील तपास करीत आहेत.

accident
Mahadayi Bachao Protest Live Updates: म्हादईचे अजिबात राजकारण करू नका - राजेंद्र केरकर

सुकतळी-मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ईनोव्हा कार व दुचाकी यांच्यात धडक झाली. या अपघातात दुचाकी चालक कादर मोहम्‍मद गौसवंती (19, कुळे) यांचा जागीच मृत्यु झाला. तर मागे बसलेला अण्णा दुराई हा जखमी झाला.

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहने मोलेहून धारबांदोड्याच्या दिशेने जात होती. सुकतळी येथे कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्‍यामुळे दुचाकी रस्त्यावर फेकली गेली व दुचाकीवरील दोघेही रस्‍त्‍यावर आदळले.

कादर गौसवंती हा अपघातात गंभीर जखमी झाल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला. तर कारचालक कबील के. एन. याने अपघातानंतर पलायन केले. मात्र पोलिसांनी त्‍याला नंतर पकडले तसेच कारही ताब्‍यात घेतली.

दरम्‍यान, शवचिकित्सेनंतर कादरचा मृतदेह कुटुंबीयाच्या स्वाधीन करण्यात आला. कुळेचे पोलिस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय धुरी पुढील तपास करीत आहेत.

accident
Porvorim : महिलांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या; राज्यात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

खांडोळा - आमोणा पुलाजवळ संध्याकाळी कार व दुचाकीत धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जीए03 डब्ल्यू 4326 या क्रमांकाची कार व जीए08 एजी 1773 या क्रमांकाची दुचाकी यांच्यात ही जोरदार धडक झाली.

अपघातात दुचाकीस्वार रेहना केशव कामत (वय 23) मालमासोडो विर्डी - साखळी गंभीर जखमी झाली. या अपघातप्रकरणी निष्काळजीपणे व भरधाव कारगाडी चालवल्याप्रकरणी कारचालक संशयित लवू गुरुनाथ पेटकर (वय 48) याच्याविरुद्ध फोंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरु आहे. जखमी रेहाना कामतला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com