डिचोलीत कारची बसला धडक; एक ठार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

या अपघातात कार चालक सिद्धार्थ सावंत (४२) हा जागीच ठार झाला.

डिचोली- येथील हाऊसिंग बोर्डजवळ उभ्या असलेल्या प्रवासी बसला कारने जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक सिद्धार्थ सावंत (४२) हा जागीच ठार झाला.

हा अपघात आज संध्याकाळी घडला. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. याप्रकरणी डिचोली पोलिस अधिक तपास करत आहे.
 

संबंधित बातम्या