गोवा-मुंबई हायवेवरील अपघातात एकाचा जागीच मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

ओणीमधील पेट्रोलपंपाकडून राकेश तुकाराम गुरव आणि समीर बाईत हे दोघे दुचाकीने चुनाकोळवणकडे निघाले होते.

राजापूर: गोवा-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या कठड्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी कठड्यावर आदळून झालेल्या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. राकेश तुकाराम गुरव असे या तरुणाचे नाव आहे. तसेच दुसरा दुचाकीस्वार समीर शंकर बाईत हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला रत्नागिरीमधील शासकीय रुग्णालयामध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना काल रात्री सव्वानऊच्या सुमारास ओणीमधील पेट्रोलपंपासमोर घटना घडली आहे. (One died on the spot in an accident on Goa Mumbai highway)

गोवा सरकारची जाहिरातबाजी वादात; शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त उल्लेख

ओणीमधील पेट्रोलपंपाकडून राकेश तुकाराम गुरव आणि समीर बाईत हे दोघे दुचाकीने चुनाकोळवणकडे निघाले होते. ओणी येथील पेट्रोलपंपासमोर असलेल्या कठड्याजवळ दुचाकी आली असता, गाडी कठड्यावर आदळली. यावेळी समीर शंकर बाईत दुचाकी चालवीत होता. राकेश त्याच्याबरोबर पाठीमागे दुचाकीवर बसला होता. या अपघातामध्ये दोघांनाही जबरदस्त मार लागला. यामध्ये राकेशच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  

संबंधित बातम्या