गोवा वेल्हा बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

अपघातात एका कारचालकाचा मृत्यू; कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती
गोवा वेल्हा बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात
Car Accident on Goa Velha BypassDainik Gomantak

पणजी : गोवा वेल्हा बायपासवर तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एका कारचालकाचा मृत्यू झाला आहे. अरफान खान (न्यू वाडे, वास्को) असं या कार चालकाचं नाव असून कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

गोवा वेल्हा येथील बगलरस्त्यावर तीन वाहनांमध्ये आज शुक्रवारी सकाळी 8.20 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा पूर्णतः चुराडा झाला. जीपला धडक दिलेल्या वाहनातील चालक आणि क्लिनर हे किरकोळ जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात स्वीफ्ट कार, जीप व आणखी कारचा समावेश आहे. स्वीफ्ट कारचा चालक हा पणजीहून वास्कोच्या दिशेने जात होता. गोवा वेल्हा येथे उड्डाणपूल संपल्यानंतर बगलरस्त्याच्या ठिकाणी स्वीफ्ट कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा निसटला व कार दुभाजकावर चढून पणजीकडे येणाऱ्या रस्त्यावर गेली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या जीपला या कारची जोरदार धडक बसली. दरम्यान, जीपच्या मागून येणाऱ्या कारने जीपला जोरदार धडक दिली. कारने जीपला दिलेली धडक इतरी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्ण तुटून पडला तसेच जीपही रस्त्यावर कलंडली.

Car Accident on Goa Velha Bypass
फोंडा कदंब बसस्थानक कात टाकणार

या अपघाताची माहिती मिळताच आगशी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चालक कारमध्ये अडकलेला होता, त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. जीपमधील जखमींना उपचारासाठी गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मात्र पोलिसांनी अपघाताचा पंचानामा करून त्वरित वाहतूक सुरळीत केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com