Goa Crime: दारुच्या नशेत कंरजाळे किनाऱ्यावर एकाचा खून; पैशांच्या व्यवहाराचा होता वाद

संशयिताने दिली गुन्ह्याची कबुली दिली
Vathadev Murder Case
Vathadev Murder CaseDainik Gomantak

पणजी: कंरजाळे समुद्रकिनाऱ्यावर दारूच्या नशेत असताना पैशांच्या व्यवहारावरून खुन झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयिताला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली ही दिली आहे.

(One has been murdered on the Caranzalem-Miramar beach)

Vathadev Murder Case
Goa Agriculture: शेतकऱ्यांना स्वयंभू बनविण्यासाठी युवकांनी पुढे यावे- रमेश तवडकर

मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री संशयित मोहनराव केलकर (29) व समीर उर्फ छोटू (36) यांच्यात वाद झाला होता. या वादादरम्यान डोक्यावर लाकडी दंडुक्याने प्रहार केल्याने समीरचा खून झाला आहे.

Vathadev Murder Case
Vasco: बेवारस वाहनांवर कारवाई सुरु; नियमांचे उल्लंघन मात्र थांबेना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री मृत समीर उर्फ छोटू व मोहनराव केसरकर हे कंरजाळे येथे समुद्रकिनाऱ्यावर आले होते. यावेळी समीर याने मोहनराव यांच्याकडून उसने पैसे घेतलेले मागण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांनीही मद्यप्राशन केले होते.

काही वेळातच त्यांचा जोराचा वाद सुरु झाला. व मोहनराव याने समीरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पैसे देत नाही असे समीरने सांगितल्यावर चिडलेल्या मोहनराव याने समुद्रकिनाऱ्यावरील लाकडी दंडुक्याने समीरच्या डोक्यावर प्रहार केला. यात समीरचा खून झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com