Goa Police : पेडणे पोलिसांची धडक कारवाई; सापळा रचत ड्रग्स विक्रेत्याच्या मुसक्या आवळल्या

संशयित मूळचा हैदराबादचा : 500 ग्रॅम गांजा जप्त
Drug dealer arrested
Drug dealer arrestedDainik Gomantak

Pernem : राज्यातील अमली पदार्थ तस्करी मोडीत काढण्यासाठी पोलिस दलाने शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी पोलीस दलाने अमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. या पार्श्वभूमीवर पेडणे पोलिसांनी सापळा रचत एका ड्रग्स विक्रेत्याला अटक केली आहे. ही कारवाई केरी येथे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलिसांकडून करण्यात आली.

Drug dealer arrested
Anmod Checkpost : महाराष्ट्रनंतर आता कर्नाटक चेकपोस्टवर 13 लाखांची दारु जप्त

पेडणे पोलिसांना ड्रग्स विक्रेता राहत असल्याची गुप्त माहीती मिळाली होती. त्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केरी येथे सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 51 वर्षीय संशयित मझर अहमद मोहम्मद याला अटक केली आहे. संशयित मूळचा हैदराबाद येथील असून तो केरी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याच्याकडून 500 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत 50 हजार रुपये इतकी आहे. पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक दताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरिक्षक विवेक हळर्णकर, हरिष वायंगणकर, महिला उपनिरिक्षक सुमेधा नाईक, पोलीस कॉस्टेबल राजेश गावडे, कृष्णा वेळीप, वासु सावंत,सागर खोर्जुवेकर, रजत गावडे यांनी ही कामगिरी बजावली.

Drug dealer arrested
Goa Fire News: शॉट सर्किटमुळे घराला भीषण आग; अग्निशमन दलाच्या सर्तकतेमुळे मोठा अनर्थ टळला

राज्यात तसेच पेडणे तालुक्यात अंंमली पदार्थांना थारा दिला जाणार नाही. किनारी भागांतील आपली घरे किंवा खोल्या भाड्याला देणाऱ्या स्थानिकांनी भाडेकरूंच्या व्यवसायाची तसेच इतर माहिती ठेवावी. आम्ही भाडेकरूंच्या पडताळणीचे काम करतच आहोत. नागरिकांनी जागरुक रहावे व भाडेकरु काही अवैध काम करत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com