Goa Accident: धक्कादायक! वेर्णा येथे भरधाव टॅक्सीने युवकाला उडवलं

आग्नेल आश्रम सर्कलजवळ घडला अपघात
 Verna accident
Verna accidentdainik gomantak

मडगाव: वेर्णा येथे भरधाव टॅक्सीने जोराची धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला युवक हा 27 वर्षाचा असून, तो झुआरी नगर येथील काम संपल्यानंतर घरी परतत असताना हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

(One killed after hit by a speeding taxi at Verna)

मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 6 च्या सुमारास सां. जुजे द आरीयल येथे राहणारा आकाश गौडा ( 27 वय ) हा जुवारी नगर येथील काम संपवल्यानंतर घरी जात होता. दरम्यान वेर्णा येथील आग्नेल आश्रम जवळील वळणावर आल्यानंतर नुवेहून कुठ्ठाळीच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या पिवळ्या टॅक्सीने गौडाला धडक दिली. यात गौडाचा मृत्यू झाला आहे.

 Verna accident
Goa Dams: 14 नोव्हेंबरपासून शेतीसाठी पाणी; धारबांदोड्यात दोन नवी धरणं- सुभाष शिरोडकर

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गौडा ( 27 वय ) हा जुवारी नगर येथे काम करत होता. काम संपवत दुचाकीने घरी जात असताना वेर्णा आग्नेल आश्रम सर्कलजवळ कुठ्ठाळीच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या पिवळ्या टॅक्सीने त्याला धडक दिली. यातच गौडा त्याचा मृत्यू झाला आहे.

 Verna accident
Goa Rain Update: गोव्यात 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान हलक्या पावसाची शक्यता

अपघातानंतर काही वेळातच जखमी गौडा याला मडगाव जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करत असताना त्याचे निधन झाले. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, धडक देणारी टॅक्सी ही काणकोण येथील दामोदर नाईक हा चालवीत होता. मात्र 27 व्या वर्षी अपघातात युवक दगावल्याची माहिती मिळताच परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com