फातोर्डा कदंब बस स्थानकावर एकाचा मृत्यू

Goa Crime News : बसमध्ये आढळलेल्या मृत व्यक्तीचे नाव आशिष फर्नांडिस असे असून तो 40 ते 45 वर्षांचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
फातोर्डा कदंब बस स्थानकावर एकाचा मृत्यू
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Crime News : येथील कदंब बस स्थानकावर एका बसमध्ये एक इसम मृतव्यस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बसमध्ये आढळलेल्या मृत व्यक्तीचे नाव आशिष फर्नांडिस असे असून तो 40 ते 45 वर्षांचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या इसमाचा नेहमी येथे वावर होता आणि सतत तो दारूच्या नशेत राहत होता, अशी माहिती समोर आली आहे.

Goa Crime News
घाऊक बाजार सोपो ठेका 'एसजीपीडीए' कडून रद्द

काही वेळा तो येथे पार्क करण्यात येत असलेल्या बसमध्ये झोपी जात होता. याच वेळी त्याचे निधन झाले आहे. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

दरम्यान, दक्षिण गोव्यातील बाणावली येथील भाड्याच्या व्हिलामध्ये बुधवारी युक्रेनियन नागरिक दिमिट्रो गुरोव (49) याचा मृतदेह सापडला, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. गुरोव डिसेंबर 2021 मध्ये गोव्यात आला होता. तेव्हापासून तो बाणावली बीचजवळ भाड्याच्या व्हिलामध्ये राहत होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com