झुआरीनगर-सांकवाळ अपघातात एक ठार

नवेवाडे-वास्को येथील प्रसाद लक्ष्मण फोंडेकर (54) यांचा काल बुधवारी रात्री एमईएस जंक्शन महामार्गावर अपघातात मृत्यू झाला.
झुआरीनगर-सांकवाळ अपघातात एक ठार
Accident CaseDainik Gomantak

वास्को : नवेवाडे-वास्को येथील प्रसाद लक्ष्मण फोंडेकर (54) यांचा काल बुधवारी रात्री एमईएस जंक्शन महामार्गावर अपघातात मृत्यू झाला. ते हॉटेल उद्योगात कार्यरत होते. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झुवारीनगर-सांकवाळ एमईएस कॉलेज जंक्शनजवळ प्रदीप यादव या दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने येऊन जीए 06 एच 7484 या दुचाकीस्वाराला धडक दिल्याने चालक प्रसाद फोंडेकर रस्त्यावर आपटले.

Accident Case
एसजीपीडीए बाजारातील कचरा न उचलण्याचा पालिकेचा निर्णय

या अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारांसाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेत असता वाटेतच त्‍यांचा मृत्‍यू झाला. अपघातास कारणीभूत ठरलेल्‍या प्रदीप यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्‍यान, प्रसाद फोंडेकर यांच्‍या पश्‍‍चात आई-वडील, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. आज गुरुवारी दुपारी खारीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्‍यांच्‍या मृत्‍यूबद्दल हळहळ व्‍यक्त करण्‍यात येत आहे. वेर्णा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, आज दुपारी 1.30 वा. कुडचडे येथील शिवाजी चौकाजवळ भरधाव चारचाकी वाहनाने एका महिलेला धडक दिली. ही महिला रस्त्याशेजारी बसची वाट बघत उभी होती. या महिलेसोबतच एका विध्यार्थीनीला आणि आणखी एका महिलेला धडक दिल्याने या तिघींनाही मडगाव येथे जिल्हा रूग्णालात दाखल करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com