हरमलात लाखांचे अमली पदार्थ जप्त

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

पेडणे पोलिसांनी आज हरमल येथे 1,11,000 रुपये किंमतीचे चरस व एमडीएमए अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी हिमाचल  प्रदेशच्या भूप टिकमराम सिंघला अटक केली.

पेडणे: पेडणे पोलिसांनी आज हरमल येथे 1,11,000 रुपये किंमतीचे चरस व एमडीएमए अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी भूप टिकमराम सिंघ (वय 21 ) कुलु, हिमाचल  प्रदेश याला अटक केली. पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक जीवबा दळवी यांना एक युवक अमली पदार्थ व्यवसायात गुंतल्याची माहिती मिळाली होती.

मुरगाव बंदरात ट्रकच्या धडकेत कामगार जागीच ठार 

त्यानुसार सापळा रचून बुध्दा टेस्टी बार जवळ संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे तो राहात असलेल्या भाड्याच्या खोलीची झडती घेण्यात आली. त्या झडतीत चरस व एमडीएमए अमली पदार्थ सापडले. पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गीरी व पोलिस सहकाऱ्यानी ही मोहीम राबविली होती.

मडगाव: वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक तर तीन युवतींची सुटका 

संबंधित बातम्या