मद्यावस्थेत झालेल्या भांडणात युवकाचा खून

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

संशयित घटनास्थळाहून म्हापसा मार्केटकडे पसार झाला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. याबद्दल अधिक तपास म्हापसा पोलिस म्हापसा पोलिस करत आहेत. 

म्हापसा- येथील केणी इमारतीजवळ आज दुपारच्या सुमारास दोन युवकांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याचे पर्यावसान खुनात झाल्याने दुसरा तरूण जागीच ठार झाला.  

मद्यावस्थेत असलेल्या दोघांपैकी एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने प्रहार केला. यात दुसरा तरूण जागीच ठार झाला. संशयित घटनास्थळाहून म्हापसा मार्केटकडे पसार झाला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. याबद्दल अधिक तपास म्हापसा पोलिस म्हापसा पोलिस करत आहेत. 

संबंधित बातम्या