फोंड्यातील एक वर्षीय बालकाचा कोरोनामुळे मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

पाचपैकी चौघे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात, तर एकजण खासगी रुग्णालयात दगावला आहे.

पणजी- राज्यात मागील चोवीस तासांत पाचजण दगावले. त्यात फोंड्यातील एका वर्षीय बालकाचा झालेल्या मृत्यूची घटना धक्कादायक ठरली आहे. आत्तापर्यंत राज्यात कोरोनामुळे ५१९ जण दगावले आहेत. आज दिवसभरात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत ३५६ ने भर पडली आहे.

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात १ हजार ४८३ जणांचे नमुणे चाचणीसाठी घेण्यात आले. दिवसभरात ३५६ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले, तर २६८ जणांना घरगुती विलगीकरणात राहण्यास अनुमती मिळाली आहे. मागील चोवीस तासांत जे पाचजण दगावले आहेत, त्यात फोंड्यातील एक वर्षीय बालकाच्या मृत्यूची घटना धक्कादायक ठरली आहे. पाचपैकी चौघे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात, तर एकजण खासगी रुग्णालयात दगावला आहे. त्यात फोंड्यातील एकवर्षी बालकासह, मडकईच्या ६३ वर्षीय पुरुषाचा, सत्तरी येथील ५१ वर्षीय महिलेचा, कांदोळी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा आणि चिंबल येथील ७६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 
 

संबंधित बातम्या