कांदा झाला खिशासाठी अपायकारक....

Onion became harmful for the pocket
Onion became harmful for the pocket

डिचोली  : दैनंदिन आहारातील एक मुख्य घटक आणि मागील आठवड्यापर्यंत स्थिर असलेल्या कांद्यासह आता भाज्यांचे दर वाढत असून कांदा तर नव्वदीत पोचला आहे. अन्य भाज्यांसह कांद्याचा तुटवडा असल्याने कांद्याचे दर शंभरी पार करणार असल्याचे संकेत काही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. आज मंगळवारी डिचोलीत किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो ९० रुपये दराने विकण्यात येत होता, तर फलोत्पादन महामंडळाच्या आऊटलेटवर कांद्याचे दर ७२ रुपये किलो असे आहेत. 


कांदा आणखीनही तिखट होण्याचे संकेत काही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. उद्या बुधवारी साप्ताहीक बाजाराच्या दिवशी कांद्यासह अन्य भाज्यांची आणखी दरवाढ होणार की दर स्थिर राहणार, ते स्पष्ट होणार आहे. कांद्याचा भाव आणखी वाढला तर पुन्हा एकदा कांद्यासाठी गृहिणींचे डोळे लाल होण्याची शक्‍यता आहे.

कांद्यासह भाज्यांचे दर अचानक वाढण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. तरी मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटकात कांदा आणि अन्य भाज्यांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती बाजारातील काही विक्रेत्यांकडून मिळाली आहे. पावसाचा फायदा उठवून विक्रेत्यांनी दरवाढ केली तर नाही ना, असा प्रश्‍न ग्राहकांना पडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com